आज अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात नागरिकांच्या विविध समस्या, सूचना व विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांनी मांडलेल्या विविध विषयांवर चर्चा करून संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या तसेच प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांची माहिती घेऊन नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷