धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह, अंबरनाथ येथे आयपीसी न्यूज 24 व इंटरनॅशनल प्रेस कम्युनिटीद्वारे आयोजित 21वा राष्ट्रीय आयपीसी रत्न अवॉर्ड 2026 सोहळा पार पडला. यावेळी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
समाज, पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक कार्य व इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. अशा प्रेरणादायी व्यक्तींच्या कार्याचा सन्मान करणारा हा सोहळा अत्यंत दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. सर्व सन्मानित व्यक्तींचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷