Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

06 Jun 2026

3 linked posts
पालेगाव पाहणी Photos

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालेगाव परिसरातील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी नालेसफाईची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देऊन नालेसफाईची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

यावेळी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या व सूचना जाणून घेण्यात आल्या तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी त्वरित आवश्यक उपाययोजना

करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या पाहणीदरम्यान प्रभाग क्रमांक २९ चे नगरसेवक श्री. सुनील वाघे उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि पावसाळ्यापूर्व आवश्यक कामांचा आढावा घेण्यासाठी ही पाहणी करण्यात आली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

चिल्ड्रन्स पार्क, म्हसके उद्यान व शिवगंगा नगर वृक्षारोपण Photos

शिवगंगा नगर, अंबरनाथ येथील चिल्ड्रन्स गार्डन व स्वतंत्र सेनानी गंगाराम दुलाजी म्हसके उद्यान येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी उद्यानांची झालेली दुरवस्था पाहून संबंधित अधिकाऱ्यांना सुशोभीकरण, स्वच्छता व आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित विरंगुळ्याची जागा उपलब्ध करून देण्यासाठी उद्यानांचे सुशोभीकरण करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

तसेच शिवगंगा नगर येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. हरित आणि सुंदर अंबरनाथ घडविण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपणासह त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी नगरसेविका सौ. सुजाता भोईर तसेच सौ. सुशीला लेखवाणी, सौ. स्वप्ना लोढ, सौ. अनिता कदम, सौ. आशा देशमुख, सौ. सुप्रिया कदम, सौ. रिता सरोज, सौ. वैशाली नलावडे, सौ. नीलम सिंग, सौ. नम्रता मस्के, सौ. ज्योती गुरबानी, सौ. सावित्री पर्वाणी, सौ. उषा वानखेडे, सौ. शामला अचारी, सौ. भारती सचदेव, सौ. संगीता मोहिनानी, सौ. वैशाली कुलकर्णी, सौ. उषा वाणी, सौ. रत्ना अमृतकर, सौ. कविता रोठे व सौ. विनी सचदेव ह्या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी उपस्थित होत्या.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

शिवराज्याभिषेक सोहळा Graphic

स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा हा केवळ इतिहासातील एक दिवस नसून स्वाभिमान, शौर्य आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे प्रतीक आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमधून प्रेरणा घेत, न्याय, पराक्रम आणि राष्ट्रभक्तीची परंपरा जपूया. शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

जय भवानी! जय शिवाजी!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद