Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

04 Jun 2026

7 linked posts
वृक्षारोपण सोहळा byte video

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य वृक्षारोपण सोहळ्यात आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

पर्यावरणाचे संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी हिरवेगार भविष्य निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करूया.

चला, एकत्र येऊन "हरित अंबरनाथ" घडविण्याच्या या उपक्रमात सहभागी होऊया. आपल्या उपस्थितीमुळे या अभियानाला अधिक बळ मिळेल.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

डॉ. शुभम माने शुभेच्छा भेट Photos

जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर यशाचे शिखर गाठणारे

युवा डॉ. शुभम श्वेता सुरेंद्र माने यांनी अंतिम वर्ष MBBS परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करून संपूर्ण कैकाडी समाजातून पहिले MBBS डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला आहे. हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे.

या आनंददायी प्रसंगी डॉ. शुभम माने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपाध्यक्ष श्री. अनिल गायकवाड देखील उपस्थित होते. समाजसेवा, रुग्णसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, हिच सदिच्छा!

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

भव्य वृक्षारोपण सोहळा Graphic

अंबरनाथ नगर परिषदेतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अंबरनाथ पूर्व, नवीन बायपास रस्ता सकाळी ९:३० वाजता त्यानंतर कल्याण–बदलापूर रोड, आयटीआय कॉलेज समोर सकाळी ११:०० वाजता हा वृक्षारोपण सोहळा पार पडणार आहे.

पर्यावरणाचे संवर्धन, प्रदूषणावर नियंत्रण आणि भावी पिढ्यांना हिरवेगार व निरोगी भविष्य देण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची सर्वात मोठी गरज आहे. अंबरनाथ शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की, या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संरक्षणाच्या या कार्यात आपले योगदान द्यावे.

चला, पर्यावरण संवर्धनासाठी एकत्र येऊया आणि आपल्या पुढील पिढ्यांना अधिक स्वच्छ, हिरवेगार आणि समृद्ध अंबरनाथ देण्याचा संकल्प करूया.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

सत्कार सोहळा Reel

पाडळी रांजणगाव येथे आयोजित कार्यक्रमात माजी सरपंच सौ. वैशालीताई करंजुले व सौ. अनिताताई साठे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच माझा नागरी सत्कार करण्यात आला. याच प्रसंगी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले-पाटील तसेच सौ. सुनिताताई गुलाबराव करंजुले-पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला. या सन्मानाबद्दल सर्व ग्रामस्थ नागरिक, आयोजक मंडळ तसेच उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.

यावेळी सौ. धनश्रीताई सुजयदादा विखे-पाटील, आमदार श्री. काशिनाथ दाते सर, सौ. प्रियंकाताई राहुल शिंदे, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सौ. सुषमा रावडे, भाजपा महिला अध्यक्ष सौ. सोनाली सालके, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. वसंत चेढे, श्री. राहुल पाटील शिंदे, वडनेर हवेलीचे सरपंच श्री. लहू भालेकर, श्री. दादाभाऊ वारे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष व सरपंच श्री. विक्रमसिंह बबनराव कळमकर, चेअरमन श्री. डी.बी. करंजुले, श्री. भास्कर पाटील करंजुले, श्री. अशोकराव जाधव, श्री. गजानन सोमवंशी, श्री. संजय कामत, सौ. भाग्यश्री गायकवाड, श्री. समीरजी झगडे, श्री. भागवत गायकवाड, श्री. संजयजी भगत, आरपीआय पारनेर तालुका अध्यक्ष श्री. राजेंद्रजी उबाळे, राळेगण थरपाचे माजी सरपंच श्री. किसन अण्णा कारखिले, पाडळी रांजणगावचे व्हाईस चेअरमन श्री. आप्पासाहेब कळमकर, गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री. आप्पासाहेब साठे, पत्रकार श्री. सुधीरजी करंजुले, पत्रकार श्री. दिपकराव करंजुले, माजी चेअरमन श्री. किरणजी साठे, श्री. सुभाषजी पाटील, श्री. वसंतराव साठे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. याशिवाय गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

खादी Graphic

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली खादीने गेल्या १२ वर्षांत विक्री, उत्पादन आणि रोजगार निर्मितीमध्ये विक्रमी वाढ नोंदवली आहे.

"वोकल फॉर लोकल" आणि "आत्मनिर्भर भारत" या संकल्पनांच्या माध्यमातून खादीला नवसंजीवनी मिळाली असून, लाखो कारागीर व महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. खादी आज केवळ वस्त्र नसून स्वदेशी, स्वावलंबन आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रतीक बनली आहे.

खादीचा स्वीकार करून स्थानिक उत्पादकांना बळ देऊया आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला अधिक सक्षम बनवूया.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

अशोक सराफ वाढदिवस Graphic

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा बादशाह, आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि विनोदी शैलीने अनेक पिढ्यांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏🏻

चार दशकांहून अधिक काळ मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची अमिट छाप उमटवणाऱ्या श्री. अशोक सराफ यांनी असंख्य गाजलेल्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.

त्यांचा साधेपणा, मेहनत आणि कलाक्षेत्राप्रती असलेली निष्ठा अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदी आयुष्य लाभो तसेच त्यांच्या हातून पुढेही अशीच उत्कृष्ट कलासेवा घडत राहो.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

RR Pandhare उद्घाटन सोहळा Photos

R R Pandhare Cement, Steel & Construction Material Supplier या नवीन व्यवसायाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचा योग आला. या शुभप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सत्यनारायण महापूजेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यात आले.

यावेळी नगरसेवक व गटनेता श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील व पत्रकार श्री. पंकज पाटील उपस्थित होते. स्थानिक उद्योजकतेला चालना देणारा हा उपक्रम निश्चितच परिसराच्या विकासात मोलाची भूमिका बजावेल.

नव्या व्यावसायिक वाटचालीसाठी श्री. रोहन राजेंद्र पांढरे यांना मनःपूर्वक शुभेच्छा! व्यवसाय उत्तरोत्तर प्रगतीपथावर जावो, ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्य लाभो तसेच नव्या उंची गाठत यशस्वी वाटचाल घडो, हीच सदिच्छा.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद