Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

03 Jun 2026

10 linked posts
अंबरनाथ शिधावाटप स्थलांतर Photos

अंबरनाथ शहरातील शिधापत्रिकाधारकांच्या सोयीसाठी अंबरनाथ शिधावाटप कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशानुसार १ जूनपासून शिधावाटप कार्यालय मास्टर बिझनेस सेंटर, प्लॉट क्र. ३४, विमको नाका, कल्याण-बदलापूर रोड, अंबरनाथ येथे कार्यरत झाले आहे.

या संदर्भातील निवेदन श्री. वासुदेव पवार यांनी सादर केले. नवीन कार्यालयाच्या ठिकाणाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी व शिधापत्रिकाधारकांना सेवांचा लाभ घेण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी नागरिकांना नव्या कार्यालयाच्या पत्त्याची माहिती देण्यात आली.

यावेळी राज्य परिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष श्री. गुलाबराव करंजुले पाटील साहेब, मास्टर बिझनेस सेंटर बनवणारे प्रसिद्ध व्यावसायिक श्री. हसमुख हरिया, शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, उपाध्यक्ष श्री. अनिल गायकवाड, श्री. वासुदेव पवार, व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री. खानजी धल, महिला प्रदेश सचिव सौ. रूपाली लठ्ठे तसेच इतर सहकारी उपस्थित होते. सर्व शिधापत्रिकाधारक नागरिकांनी पुढील कामकाजासाठी नव्या कार्यालयाशी संपर्क साधावा व शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

जोशी रिक्षा स्टॅन्ड पदाधिकारी सदिच्छा भेट Photos

जोशी रिक्षा स्टॅन्डच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरण व खड्डे दुरुस्तीच्या कामाबाबत चर्चा केली. काही दिवसांपूर्वी त्यांनी यासंदर्भात निवेदन दिले होते. त्यानुसार संबंधित कामासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली असून शहर अभियंता श्री. तरडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे.

तसेच लोकनेते, राज्य परिषद सदस्य तथा अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मा. श्री. गुलाबराव करंजुले पाटील (आप्पासाहेब) यांनीही मार्गदर्शन करत नागरिकांच्या सोयीसाठी ही कामे गुणवत्तापूर्ण व तत्काळ पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच खड्डे दुरुस्तीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शहर अभियंता श्री. तरडे साहेब यांना निर्देश देण्यात आले.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नवीन रिक्षा स्टॅन्ड उद्घाटन Photos

लोकनेते, राज्य परिषद सदस्य तथा अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री. गुलाबराव करंजुले पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बी केबिन रोड परिसरातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी!

बी केबिन रोड येथे वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन नव्याने रिक्षा स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रीन सिटी, पाठारे पार्क, नवरे नगर तसेच परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा होण्यास मदत होणार आहे.

नवीन रिक्षा स्टँडमुळे रिक्षांची शिस्तबद्ध उभी राहण्याची व्यवस्था होऊन बी केबिन रोडवरील वाहतूक कमी होण्यास मदत होईल. यावेळी नगरसेवक व गटनेता श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री. खानजी धल व अनेक मान्यवर उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

अभिष्टचिंतन सोहळा Photos

सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे लोकनेते, राज्य परिषद सदस्य तथा अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री. गुलाबराव करंजुले पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी अंध बांधवांसोबत वाढदिवस साजरा करून त्यांना भेटवस्तू व मानधन प्रदान करण्यात आले. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला व तरुणींना प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा देण्यात आल्या. सामाजिक बांधिलकी जपणारे आणि समाजातील विविध घटकांना बळ देणारे असे अनेक उपक्रम या निमित्ताने राबविण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक व गटनेता श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, उद्योग आघाडी संयोजक श्री. समीर नागे, भाजपा उपाध्यक्ष श्री. अनिल गायकवाड, उपाध्यक्ष श्री. मिलिंद गान, व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री. खानजी धन तसेच डॉ. राम जामोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

आयुष्यमान आरोग्य मंदिर उद्घाटन Photos

लोकनेते, राज्य परिषद सदस्य तथा अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री. गुलाबराव करंजुले पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंबरनाथ पश्चिम येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर पुन्हा एकदा नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहे.

या आरोग्य केंद्रामार्फत परिसरातील नागरिकांना विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, आशा सेविका देखील नागरिकांना मार्गदर्शन व मदत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत.

यावेळी नगरसेवक व गटनेते श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, अंबरनाथ शहर उपाध्यक्ष श्री. अमरेश गोवडा, नगरसेविका सौ. वैशाली थेटे तसेच नगरसेवक श्री. पवन वाळेकर उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

बर्थडे सेलिब्रेशन भवानी चौक, खुंटवली Photos

लोकनेते, राज्य परिषद सदस्य तथा अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री. गुलाबराव करंजुले पाटील (आप्पासाहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ पश्चिम येथील भवानी चौक, खुंटवली येथे नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत आणि जल्लोषपूर्ण वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड, शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक व गटनेते श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री. पवन वाळेकर, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, नगरसेविका सौ. मिनू सिंग, नगरसेवक श्री. स्वप्निल बागुल, भाजपा उपाध्यक्ष श्री. मिलिंद गान, श्री. आकाश वाळेकर, सौ. ममता त्रिपाठी, श्री. बबलू सिंग, सौ. शितल पवार, सौ. ज्योती भंडारे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आप्पासाहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व निरंतर समाजसेवेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

भाजपा जनसंपर्क कार्यालय उद्घाटन Photos

लोकनेते, राज्य परिषद सदस्य भाजपा महाराष्ट्र राज्य तथा अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री. गुलाबराव करंजुले पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, नगरसेवक व गटनेता श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मातोश्री नगर जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या भाजपा संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्यात येणार आहे. याप्रसंगी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेविका सौ. वैशाली थेटे व अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

विद्यार्थी गौरव सोहळा, नाट्यगृह Reel

धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह, अंबरनाथ (पश्चिम) येथे गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा उत्साहात पार पडला. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या शालांत व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवून समाज व देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे, अशा शुभेच्छा यावेळी मान्यवरांनी दिल्या.

यावेळी कल्याण जिल्हा इलेक्शन इन्चार्ज श्री. नाना सूर्यवंशी, गटनेता व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, माजी जिल्हा सचिव डॉ. आशिष पावसकर, भाजपा उपाध्यक्ष श्री. मिलिंद गान, व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री. खानजी धन, उपाध्यक्ष श्री. दीपक कोतेकर, नगरसेवक श्री. मनीष गुंजाळ, भाजपा युवा अध्यक्ष श्री. अतिश पाटील, नगरसेविका सौ. वैशाली थेटे, श्री. विश्वास निंबाळकर, श्री. विक्रम राठोड, भाजपा उपाध्यक्ष श्री. अनिल गायकवाड, नगरसेविका सौ. सुजाता भोईर तसेच इतर मान्यवर, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

संकष्टी चतुर्थी Graphic

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

श्री गणेशाच्या कृपेने सर्वांच्या जीवनातील संकटे, अडचणी व दुःख दूर होऊन सुख, समृद्धी, आरोग्य, यश आणि आनंद लाभो, हीच श्रीचरणी प्रार्थना.

संकष्टी चतुर्थीचा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि नवचैतन्य घेऊन येवो. गणरायाची कृपादृष्टी सदैव आपल्या सर्वांवर राहो. सर्व गणेशभक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब पुण्यतिथी Graphic

लोकनेते, ओबीसी समाजाचे बुलंद नेतृत्व, जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटवणारे स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र त्यांना अभिवादन! 💐

ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य, त्यांची लोकाभिमुख नेतृत्वशैली आणि समाजसेवेची तळमळ आजही असंख्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद