Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

02 Jun 2026

3 linked posts
भाजी मार्केट प्रस्ताव बैठक Photos

बांगडी गल्ली येथील विद्यमान भाजी मार्केटच्या जागी आधुनिक सुविधा व सुसज्ज पायाभूत व्यवस्था असलेले भव्य छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केट उभारण्याच्या नियोजनासंदर्भात आज महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी प्रस्तावित भाजी मार्केटचा आराखडा सादर करण्यात आला. तसेच बांधकाम कालावधीत विद्यमान विक्रेते व दुकानदारांच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी त्यांचे तात्पुरत्या जागेवर पुनर्वसन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या प्रकल्पासंदर्भात संबंधित दुकानदार, विक्रेते व इतर घटकांच्या स्वतंत्र बैठका घेऊन त्यांच्या सूचना व मते जाणून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. विक्रेत्यांचा व्यवसाय सुरळीत राहावा, नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि मार्केटचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

यावेळी राज्य परिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष श्री. गुलाबराव करंजुले पाटील, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड, शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, गटनेता व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री. अब्दुल शेख, नगरसेवक श्री. सुभाष साळुंखे, गटनेते श्री. रवी करंजुले तसेच व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री. खानजी धल उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

नामफलक व cctv प्रकल्प Photos

लोकनेते, राज्य परिषद सदस्य तथा अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मा. श्री. गुलाबराव करंजुले पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीराम नगर रहिवासी सेवा संघामार्फत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी नामफलक, परिसर नकाशा फलक तसेच CCTV सुरक्षा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

नागरिकांच्या सुरक्षिततेसह परिसराचे सुशोभीकरण, सुविधा व विकास अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

यावेळी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, भाजप सरचिटणीस श्री. राजेंद्र कुलकर्णी, अंबरनाथ नगरपरिषद उपनगराध्यक्ष श्री. सदाशिव पाटील, माजी नगराध्यक्ष श्री. सुनील चौधरी, भाजप माजी कार्यालय मंत्री श्री. मोहन कुलकर्णी, नगरसेवक श्री. सुभाष साळुंखे, महिला प्रदेश सचिव सौ. रूपाली लठ्ठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

वाढदिवस शुभेच्छा भेट Photos

लोकनेते, राज्य परिषद सदस्य तथा अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री. गुलाबराव करंजुले पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगरसेवक श्री. सुभाष साळुंखे, ABC केबलचे संचालक श्री. अनिल गायकवाड तसेच गटनेते श्री. रवी करंजुले यांनी उपस्थित राहून साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी साहेबांच्या समाजकारण, जनसेवा आणि विकासाभिमुख कार्याचा गौरव करत त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद