Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

01 Jun 2026

3 linked posts
अहिल्यादेवी होळकर जयंती Photos

मारवाडी गल्ली, नवीन भेंडी पाडा, अंबरनाथ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नवतरुण मंडळ, अंबरनाथ यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

स्त्रीशक्ती, न्याय, लोककल्याण आणि सुशासनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी

नगरसेविका सौ. मीना वाळेकर, नगरसेविका सौ. धनलक्ष्मी जयशंकर, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

सरोदय नगर परिसरातील गार्डन पाहणी Photos

सर्वोदय नगर परिसरातील उद्यानाला भेट देत पाहणी करण्यात आली, यावेळी शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक श्री. शैलेश भोईर, श्री. सचिन भोईर आणि श्री. प्रवीण भोईर उपस्थित होते.

पाहणीदरम्यान उद्यानात लहान मुले आनंदाने खेळताना दिसत होते. उद्यानातील हे उत्साही आणि आनंदी वातावरण पाहून अशा सार्वजनिक सुविधांचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले.

उद्यान हे केवळ विरंगुळ्याचे ठिकाण नसून समाजातील विविध वयोगटांना एकत्र आणणारे, आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणारे आणि सामाजिक सलोखा वाढवणारे केंद्र आहे.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

गुलाबराव सर वाढदिवस Graphic

लोकनेते, राज्य परिषद सदस्य, अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री. गुलाबराव करंजुले पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

सामाजिक, राजकीय व जनसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत जनसामान्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे आप्पासाहेब यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो. आपला जनसंपर्क, लोकहिताची तळमळ आणि विकासाची दूरदृष्टी अशीच कायम प्रेरणादायी राहो.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद