Ambarnath Portal
Directory, updates, and community links

World Environment Day 2026

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

Mon
Tue
Wed
Thu
Fri
Sat
Sun
1
3 posts
2
1 post
3
4
1 post
5
3 posts
6
3 posts
7
3 posts
8
6 posts
9
4 posts
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30

01 Nov 2026

3 linked posts
भारतीय सैन्यदलातील जवान श्री. राजेंद्र कुशहर यादव यांच्या सेवानिवृत्ती समारंभास उपस्थिती photos

भारतीय सैन्यदलातील जवान श्री. राजेंद्र कुशहर यादव यांच्या सेवानिवृत्ती समारंभाला उपस्थित राहून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

देशसेवेसाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील आयुष्यात सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच सदिच्छा. 🇮🇳

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

अंबरनाथमध्ये FAMA आयोजित ७० व्या केरळ पिरवी महोत्सवाला सदिच्छा भेट photos

७० वा केरळ पिरवी महोत्सव – संस्कृती आणि परंपरेचा सुंदर उत्सव! ✨

आज अंबरनाथ पश्चिम येथील धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर येथे Federation of Ambernath Malayalee Associations (FAMA) यांच्या वतीने आयोजित ७० व्या केरळ पिरवी महोत्सवाला सदिच्छा भेट दिली.

केरळची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची सुंदर अनुभूती यावेळी घेता आली. विविधतेतून एकता आणि सांस्कृतिक वारसा जपणारा हा महोत्सव निश्चितच कौतुकास्पद आहे.

यावेळी अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. डॉ. बालाजी किणीकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या सुंदर आयोजनासाठी FAMA आणि सर्व संलग्न संस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा! 💐

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

लोकशाही बचाव पदयात्रा! Reel

लोकशाही बचाव पदयात्रा! 🚩

ठाणे पश्चिम येथील पाचपाखाडी परिसरात भाजपा-महायुतीच्या वतीने अराजकतेच्या निषेधार्थ लोकशाही बचाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि लोकशाही व्यवस्थेप्रती आपली बांधिलकी व्यक्त करणाऱ्या या पदयात्रेच्या निमित्ताने उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला.

लोकशाहीचा सन्मान, जनतेचा आवाज हाच आमचा अभिमान! 🚩

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद