💐 सेवानिवृत्तीच्या नव्या पर्वासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
काल अंबरनाथ नगरपरिषदेच्या कर्मचारी श्रीमती सुरेखा सोलंकी यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नगरपरिषदेतील प्रदीर्घ सेवेनंतर सुरू होणारा आयुष्याचा हा नवा प्रवास आनंद, उत्तम आरोग्य आणि समाधानाने भरलेला असो, हीच सदिच्छा! त्यांच्या सेवाकार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी युनियन लीडर श्री. सचिन मंचेकर, उपमुख्य अधिकारी श्री. धनंजय गुरव, एस.आय. श्री. संदीप खोजे, मुकादम श्री. आकाश गायकवाड, मुकादम श्री. नरेंद्र कटके, मुकादम श्री. छगन भोईर तसेच बदलापूर नगरपरिषदेचे एस.आय. श्री. पुंडलिक शेकटे यांच्यासह नगरपरिषदेतील कर्मचारी वर्ग आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आपल्या सेवेतून दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷