महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ येथे ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढी लिमिटेड, अंबरनाथ शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ३९ व्या गुणगौरव समारंभास उपस्थित राहण्याचा व योग आला. या सोहळ्यात गुणवंत सभासद आणि त्यांच्या पाल्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि गुणवत्तेचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे.
यावेळी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.डॉ. बालाजी किणीकर, कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. संतोष भगणे तसेच समारंभ अध्यक्ष व विद्यासेवक पतपेढी अध्यक्ष श्री. सुधीर घागस उपस्थित होते.
या सुंदर सोहळ्याच्या आयोजनाबद्दल संस्थेचे आभार आणि सर्व गुणवंत विद्यार्थी व सभासदांचे अभिनंदन!
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷