अंबरनाथ पश्चिम येथील नवीन भेंडीपाडा परिसरात पाणीप्रश्नाबाबत आयोजित आंदोलनस्थळी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मागील अनेक वर्षांपासून पाण्यासाठी नागरिकांना करावा लागत असलेला संघर्ष अत्यंत गंभीर असून, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला.
मात्र, अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याने नागरिकांच्या संतापात आणखी भर पडली. पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून, तो मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले की, नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नावर तातडीने ठोस कार्यवाही झाली नाही, तर यापुढे अधिक कठोर पाऊल उचलण्यात येईल.
या आंदोलनावेळी जिल्हाध्यक्ष श्री. नंदू परब, गटनेता व नगरसेवक श्री. अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील, MJP उपविभागीय अधिकारी श्री. के. एम. शेकोकर, अंबरनाथ शहर पश्चिम मंडळ उपाध्यक्ष श्री. अंबरेश गौडा, नगरसेवक श्री. प्रदीप नाना पाटील, नगरसेवक श्री. विपुल पाटील, नगरसेवक श्री. किरण राठोड, नगरसेवक श्री. दिनेश गायकवाड, समाजसेवक श्री. चरण रासाळ, माजी नगरसेवक श्री. मिलिंद पाटील, नगरसेविका सौ. संगीता गायकर, नगरसेविका सौ. मीनू सिंग, नगरसेविका सौ. मीना वाळेकर, समाजसेवक श्री. बबलू सिंग तसेच समाजसेवक श्री. किसन गायकर उपस्थित होते.
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷