Ambarnath Portal
Directory, updates, and community links
Gudi Padwa Greetings

www.Ambarnath.in

We are getting ready!

Instagram Calendar

पोस्ट दिनदर्शिका

त्या दिवसाचे Instagram पोस्ट्स पाहण्यासाठी तारखेवर क्लिक करा.

Mon
Tue
Wed
Thu
Fri
Sat
Sun

06 May 2026

2 linked posts
नगरपालिका कार्यालय Photos

आज अंबरनाथ नगरपरिषद कार्यालयात शहरातील विविध भागांतील नागरिकांनी आपल्या सूचना, तक्रारी व विविध समस्या मांडल्या. त्यांच्या प्रत्येक प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच अनेक नागरिकांनी सदिच्छा भेट देत विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या आमंत्रण पत्रिका दिल्या. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अपेक्षा व सूचनाही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काही महत्त्वाच्या विषयांवर त्वरित कार्यवाही करण्याबाबत आश्वासन देण्यात आले

तसेच आगामी काळात नागरिकांच्या सहभागातून अधिक परिणामकारक कामे करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. आपल्या सर्वांच्या विश्वासामुळेच सेवा करण्याची प्रेरणा मिळते.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी Graphic

थोर समाजसुधारक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 🙏🏻 बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाची दारे खुली करून, सामाजिक समतेचा पाया मजबूत करणारे दूरदर्शी नेतृत्व म्हणजे राजर्षी शाहू महाराज..

आरक्षणाची संकल्पना राबवून वंचितांना न्याय देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. त्यांचे कार्य, विचार आणि आदर्श आजही समाजाला योग्य दिशा दाखवतात. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा वारसा आपण पुढे नेण्याचा संकल्प करूया.

CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷

Welcome To Ambarnath

एक मजबूत, स्वच्छ आणि सक्षम अंबरनाथ घडवूया

नगराध्यक्षा म्हणून माझे पहिले कर्तव्य म्हणजे स्वच्छ प्रशासन, कार्यक्षम सेवा आणि सर्वसमावेशक विकास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे.

माझी अंबरनाथसाठीची दृष्टी स्पष्ट आहे — भ्रष्टाचारमुक्त, प्रगत, स्वच्छ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम शहर उभे करणे, जे प्रत्येक कुटुंबाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करेल.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि पारदर्शक प्रशासन या आधारांवर आपण अंबरनाथ अधिक सक्षम, दयाळू आणि पुढारलेले शहर बनवू.

चला, आपण सर्वांनी मिळून असे अंबरनाथ घडवूया जिथे विकासाचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि कुणीही मागे राहणार नाही.

– सीए सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले-पाटील नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद