सर्वोदय विद्यालय ग्राउंड, अंबरनाथ येथे कॉर्नरस्टोन सर्वोदय टर्फ उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या आधुनिक टर्फमुळे खेळाडूंना उत्तम सुविधा मिळणार असून त्यांच्या कौशल्याला नक्कीच नवी दिशा मिळेल.
या टर्फचे उद्घाटन मुरबाड विधानसभा आमदार मा. श्री. किसनजी कथोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देताना विशेष आनंद झाला. तरुणाईला क्रीडाक्षेत्रात पुढे नेण्यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत.
आपली ओळख राज्य आणि देशपातळीवर निर्माण करावी, यासाठी अशा सुविधा आणि संधी खरंच गरजेच्या आहेत. विकास, क्रीडा आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे
CA सौ. तेजश्री विश्वजीत करंजुले पाटील
नगराध्यक्षा, अंबरनाथ नगरपरिषद 🪷